![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलाचा दोन मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठलाग करून कुत्र्यांचा हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लहान मुलगा घराबाहेर रस्त्यावर असताना हा भयंकर प्रकार घडला. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या दोन मोकाट कुत्र्यांनी अचानक या मुलाला लक्ष केले. कुत्र्यांना अंगावर धावून येताना पाहून हा चिमुकला घाबरून पळू लागला. मात्र, या दोन कुत्र्यांनी त्याचा हिंस्रपणे पाठलाग केला आणि त्याला गाठून त्याच्यावर थेट झडप घातली. कुत्र्यांनी मुलाला खाली पाडून त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. रुग्णालयात दाखल अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लहानग्याने जीवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. मुलाचा रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांनी आरडाओरड करत आणि दगड मारून या हिंस्र कुत्र्यांना तेथून पळवून लावले. मात्र, तोपर्यंत कुत्र्यांनी चावा घेतल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या चिमुकल्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप या घटनेमुळे दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील पालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांवर हल्ला करणे अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. 8 कुत्र्यांनी 3 वर्षांच्या बालकाला शिर,पाय धडापासून वेगळे करून ठार मारले: खुलताबादेतील घटना
दरम्यान, महिनाभरापूर्वी खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे माटेगाव चौफुली ते देवपुढी रस्त्यावरील शेतवस्तीवर 8 हिंस्र कुत्र्यांच्या टोळक्याने अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकल्याचे लचके तोडून ठार केले. कुत्र्यांनी बालकाचे मुंडके आणि डावा पाय धडापासून वेगळा केला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची परिसीमा म्हणजे, या चिमुकल्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने मृत्यूशी झुंजताना त्याने मारलेली शेवटची आर्त हाकही तिच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेले गजानन पाटील हे रोजगाराच्या शोधात खुलताबाद तालुक्यात आले. ते आपल्या कुटुंबासह एका पोल्ट्री फार्मवर मजुरी करत होते. बुधवारी भरदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांचा तीन वर्षांचा मुलगा सार्थक खेळता खेळता घराबाहेर आला. याचवेळी मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने या कोवळ्या जीवावर अचानक हल्ला चढवला. सविस्तर बातमी वाचा..
Source link