Headlines

पुण्यामध्ये ब्यूटी पार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून:घटनेनंतर आरोपी पसार, मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ आढळला



ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोपी पसार झाला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

.

आफरीन सलीम पठाण (२९, सध्या रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत आफरीनची लहान बहीण अरबिना सय्यद (२४, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ रा. खुडुसवाडा, चिंचघर, जि. पालघर ) हिने ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आफरीन हिचा ब्यूटी पार्लरचा व्यवसाय होता. महिला ग्राहकांनी संपर्क साधल्यानंतर ती घरी जाऊन ब्यूटी पार्लरविषयक कामे करत असे. ५ मे रोजी ती एका महिला ग्राहकाकडे कामाला गेली होती. तिचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ सापडला.

शवविच्छेदनात गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट

तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. केशवनगर कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. स्थानिक पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *