Headlines

पेट्रोलच्या भावात पाणी विकून मोठी फसवणूक:गडकरींनी राजीनामा द्यावा; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका




ई- 20 इंधनाच्या नावाखाली थेट पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाणी मिसळून वाहनधारकांची मोठी फसवणूक केली जात आहे. हा एक महाघोटाळा असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चा, एसआरए (SRA) घोटाळा आणि भाजप नेत्यांमधील नैराश्य यावरही सडकून टीका केली. पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याचा महाघोटाळा नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडून नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाचे समर्थन करत सपकाळ म्हणाले, ई-२० इंधनाचा निर्णय प्रत्यक्षात 2030 मध्ये लागू होणे अपेक्षित होते. मात्र, स्वतःच्या हितसंबंधी लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी हा निर्णय घाईगडबडीत लागू करण्यात आला. इथेनॉलच्या ऐवजी थेट पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाणी मिसळले जात असल्याच्या मोठ्या तक्रारी समोर येत आहेत. यामुळे अनेक नागरिकांची वाहने खराब झाली आहेत. राजीनाम्याची मागणी या घोटाळ्यात गडकरी, मोदी आणि फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करत, इथेनॉलची वकिली करणाऱ्या नितीन गडकरी यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसेच, पेट्रोलच्या भावात पाणी विकून फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अमित शहा खरे मुख्यमंत्री; फडणवीस केवळ शॅडो सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीला जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चांवरून त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला, महाराष्ट्रातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकारमध्ये सध्या टोळीयुद्ध सुरू आहे. राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा हेच आहेत, तेच सर्व निर्णय घेतात. देवेंद्र फडणवीस हे केवळ ‘शॅडो मुख्यमंत्री’ उरले आहेत. संघाचा अजेंडा राबवण्यासाठी दिल्लीवारी भाजप सध्या अशा शिक्षणमंत्र्याच्या शोधात आहे, ज्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास नाही आणि जो अंधश्रद्धा व मानसिक गुलामगिरीला खतपाणी घालेल. संविधानातील कलमे हटवून मनुस्मृती आणण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) अजेंडा राबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच ‘सुयोग्य व्यक्ती’ असल्याने त्यांना केंद्रात नेले जाऊ शकते, असा दावा सपकाळ यांनी केला. भाजप नेत्यांमधील वाढते नैराश्य महायुतीमधील काही महिला मंत्र्यांनी (पंकजा मुंडे यांच्या संदर्भाने) राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, “भाजपमध्ये सध्या ‘मेरी आवाज सुनो’ अशी एकाधिकारशाही आणि हुकूमशाही सुरू आहे. सत्तेचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे हे खरे रूप पाहिल्यामुळेच नेत्यांमध्ये वैफल्य आले असून, त्यातूनच ते निवृत्तीची भाषा करत आहेत.” SRA घोटाळ्याचे मूळ फडणवीसांच्या हस्तकाकडे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या सचिवाला एसआरए प्रकरणात अटक झाल्याबाबत विचारले असता, त्यांनी हा सरकारचा डाव असल्याचे म्हटले, “हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असू शकतात. एसआरए (SRA) प्रकल्प सध्या देवेंद्र फडणवीसांचे हस्तक मोहित कंबोज चालवत आहेत, त्यामुळे खरा भ्रष्टाचार तिथेच झाला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार अशी बदमाशी करत आहे.” दरम्यान, नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत आणि राम मंदिर देणगीबाबत (चंदा) बोलताना, या सर्व प्रकरणांची आधी सखोल चौकशी व्हावी आणि त्यानंतरच भाष्य करणे योग्य ठरेल, अशी सावध भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली. हेही वाचा… ‘पालकमंत्री करा’च्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका: म्हणाले- ‘फ्लेक्स काढायला सांगितले, नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या’ नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘छगन भुजबळांना पालकमंत्री करा’ अशी मागणी करणारे होर्डिंग लावल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या मागणीपासून स्वतःला दूर ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित फ्लेक्स तत्काळ काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले, “भुजबळांना पालकमंत्री करा, याचा अर्थ मीच पालकमंत्री व्हावे असा नाही. ज्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्याबद्दल मी नापसंती व्यक्त केली असून ते तत्काळ काढण्यास सांगितले आहे.” येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *