![]()
पैठण | प्रतिनिधी राज्यात वाढती महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी दर तसेच पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी पैठण शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले. निवेदनात जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वझर येथील शेतकरी गोपीनाथ सरकटे यांचा डिझेल मिळविण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ही घटना शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे द्योतक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला कायदेशीर हमीभाव देण्याचा कायदा करावा, गोपीनाथ सरकटे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सचिव बबलू बागवान, भगवान बनसोडे, भारत आठवले, सतीश बोरुडे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी सोनवणे,यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. पैठणमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन के ले . यावेळी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले.
Source link
पैठणमध्ये शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन:शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने