Headlines

पैठण येथील जांभूळबनात सेवेकऱ्यांचा पर्जन्यचंडीयाग:कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम




पैठण प्रशांत महासागरातील बदलांमुळे निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रादुर्भावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळबनात रविवारी श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने पर्जन्यचंडीयाग करण्यात आला. देशावरचे दुष्काळाचे सावट टळावे आणि बळीराजा सुखावावा, यासाठी स्वामी चरणी सुपर्जन्यासाठी साकडे घालण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाने या यागाचे आयोजन करण्यात आले होते. वेळेवर आणि चांगला पाऊस व्हावा या उद्देशाने हा धार्मिक विधी करण्यात आला. या प्रसंगी पैठणमधील गागाभट्ट चौक केंद्र, रामनगर केंद्र तसेच छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील ग्राम अभियानातील सेवेकरी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *