Headlines

पोटच्या गतिमंद मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचार:गुंगीच्या गोळ्या देत 10 वर्षांपासून करत होता छळ, हिंगोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल




हिंगोली जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. नोकरीच्या निमित्ताने हिंगोलीत राहणाऱ्या एका निवृत्त जिल्हा परिषद शिक्षकानेच स्वतःच्या गतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर तब्बल 10 वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम वडिलाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील एका गावातील व्यक्तीला हिंगोली जिल्हयात जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळाली होती. मात्र त्याचा कौटूंबिक वाद असल्याने त्याची पत्नी त्याच्या सोबत राहात नव्हती. मात्र तो व्यक्ती त्याच्या गतिमंद मुलीस हिंगोली येथे घेऊन येत होता. सन 2016 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत त्याने मुलगी अल्पवयीन तसेच गतिमंद असतांनाही तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दरम्यान, सदर शिक्षक दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी विदर्भात राहण्यासाठी गेला आहे. यावेळी त्या मुलीच्या आईने तिच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी नागपूर येथे रुग्णालयात नेले होते. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर मुलीच्या आईने तिला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकारामुळे संतापलेल्या मुलीच्या आईने नागपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर घटना हिंगोली येथे घडल्यामुळे पोलिसांनी सदर गुन्हा हिंगोली शहर पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी त्या मुलीच्या शिक्षक वडीला विरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, उपनिरीक्षक युवराज वाघमारे यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *