Headlines

पोटच्या पाच वर्षांच्या चिमुरड्यावर पित्याकडूनच लैंगिक अत्याचार:शिवसैनिकांच्या मध्यस्थीनंतर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे उघडकीस




शहरातील सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ३२ वर्षीय नराधम पित्याने आपल्या अवघ्या ५ वर्षांच्या निष्पाप मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित बालकाच्या ३२ वर्षीय मातेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथील एका गृहप्रकल्पात वास्तव्यास आहे. सन २०२५ पासून फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी पित्याने हे कृत्य केले. आरोपीने घरामध्ये कोणी नसताना वेगवेगळ्या वेळी निष्पाप बालकाला धमकावून त्याच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर हे कृत्य जर कुणाला सांगितले किंवा आईला माहिती दिली, तर इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून देण्याची क्रूर धमकीही आरोपीने मुलाला दिली होती. या अत्याचारामुळे बालकाच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. अलीकडेच बालकाच्या वाढदिवसानिमित्त घरात आनंदाचे वातावरण असताना तो अचानक अत्यंत गंभीर झाला. तो अबोल झाला. मुलाची बदललेली वर्तणूक पाहून आईला संशय आला. त्याच्या मनातील भीतीही तिला जाणवली. तिने अत्यंत विश्वासाने मुलाला जवळ घेऊन चौकशी केली. चिमुरड्याने त्याच्यासोबत घडलेला अंगावर काटा आणणारा सर्व प्रकार आईला रडून सांगितला. पतीकडूनच आपल्या पोटच्या मुलावर असा अत्याचार होत असल्याचे ऐकून मातेला प्रचंड धक्का बसला. यानंतरही आईकडून या प्रकाराबद्दल पोलिसांमध्ये जाण्यासाठी भिती वाटत होती. या प्रकाराची माहिती शिवसैनिकांनी दिलासा देत पोलिस ठाण्यात जावुन पीडितेला सहकार्य केले तसेच या प्रकाराबाबत धिरही दिला. बदनामीच्या भीतीपोटी मातेने टाळले, शिवसैनिकांच्या मदतीने मिळाला धीर सुरुवातीला कौटुंबिक बदनामीच्या भीतीपोटी मातेने पोलिस ठाण्यात जाणे टाळले होते. मात्र मुलाची ढासळत चाललेली मानसिक स्थिती पाहून तिने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे धाव घेतली. त्यानंतर आदित्य दहिवाल यांनी पीडितेसह कुटुंबीयांना धीर दिला. त्यांनी विश्वास दिला. ते पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत आहेत. इनसाइड स्टोरी – लव्ह जिहाद प्रकरण – पीडित मुलाच्या आईवरीर पतीच्या चुलत्याकडून अत्याचार यातील पीडित मुलाच्या आई-वडिलांचा विवाह हा लव्ह जिहाद प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेचा आरोपीसोबत ६ वर्षांपूर्वी मुस्लिम पद्धतीने विवाह झाला आहे. त्यानंतर त्यांना एक अपत्य झाले. मात्र काही दिवसांनी पतीच्या चुलत्याने अत्याचार केला. पतीच्या भावानेही अत्याचार केला. त्यामुळे डिसेंबर २०२४ पासून आरोपी व महिला वेगवेगळे राहत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *