Headlines

पोलिस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार:PSIसह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, अटक न झाल्यास पीडितेचा धरणेचा इशारा




‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांकडूनच नागरिकांचे शोषण झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली आहे. पोलिस भरती तसेच ‘बँड्समन’ भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आणि नोकरीत दाखल करण्याचे आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कॉन्स्टेबलवर बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस दलात कार्यरत असल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. मारुती करे हा मुंबई बँड पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून सेवेत आहे. भरतीचे आमिष दाखवून विश्वासघात मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत होती. याचाच फायदा घेत आरोपींनी तिला पोलिस दल आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे तसेच नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. या आमिषाच्या बळावर आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत तिचे मानसिक व शारीरिक शोषण केले. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा नोंद आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पीडित महिलेने आधी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, तिथून दाद न मिळाल्याने अखेर पीडितेने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या थेट आदेशानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (SC/ST Atrocities Act) गुन्हा दाखल केला आहे. अटक झाली नाही तर एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन इतका गंभीर गुन्हा दाखल होऊनही पोलिस प्रशासन आपल्याच सहकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आणि अटक करत नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. “गंभीर गुन्ह्याची नोंद होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले नाही, तर मी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक (SP) कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करेन,” असा इशारा या पीडित महिलेने दिला आहे. रक्षकच भक्षक बनल्याच्या या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून, वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी आता कोणती कडक पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… राम मंदिराची दानपेटीही सुरक्षित नाही, मग भाजपसोबत कसे जाणार?:आदित्य ठाकरेंचा थेट सवाल, फडणवीसांवरही जोरदार हल्लाबोल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणापासून ते पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण, महागाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेतील भाषण आणि विरोधकांवरील दबाव अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला लक्ष्य केले. सविस्तर वाचा… राज्यात समान नागरी कायद्याच्या हालचालींना वेग:मुख्यमंत्री फडणवीसांकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा; हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या हालचालींना राज्य सरकारने मोठा वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. या समितीला येत्या 6 महिन्यांत आपला अहवाल सादर करायचा असून, या वर्षीच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात हा कायदा सभागृहासमोर मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *