![]()
फत्तेपूर आठवडे बाजारातील व्यावसायिक थेट राज्य मार्गावर अतिक्रमण करू लागले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहनचालक त्रस्त होत आहेत. त्यासोबत अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. या कोंडीकडे पोलिस प्रशासनासह ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्
.
फत्तेपूर आठवडे बाजारातील दुकानांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आठवडे बाजाराची जागा मात्र पुरेशी नसल्याने व्यावसायिक जामनेर धामणगाव राज्य मार्गावर अतिक्रमण करून दुकाने थाटू लागले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहन चालकांना ना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर गावातून बाहेर येण्यासाठीच्या दोन मार्गांवरही दुकाने थाटले जात असल्याने आठवडे बाजाराच्या दिवशी गावातील वाहने बाहेर काढणे अवघड होत आहे. राज्यमार्गावरील वाहतूक कोंडी पाहता पोलिस प्रशासनासह ग्राम पंचायतीने लक्ष देऊन आठवडे बाजाराचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फत्तेपूर कांग नदी पुलावरही व्यावसायिक दुतर्फा दुकाने लावतात. त्याचबरोबर दुतर्फा अवैध प्रवासी वाहनांची व बाजारासाठी येणाऱ्या बाजार करूनच्या वाहने पार्किंग केली जातात. यामुळे पुलावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. बस स्थानकावर तर पादचाऱ्यांना चालणे अवघड होत आहे. गर्दी पाहता अपघाताचा धोका वाढला आहे.
पर्यायी जागा आवश्यक फत्तेपूर शहरापासून जुन्या गोद्री रोडलगत नदीकाठी ग्रामपंचायतची चार एकर जागा आहे. सध्याच्या आठवडे बाजाराची जागा आठवडे बाजारासाठी पुरेशी नसल्याने ग्रामपंचायतीच्या हक्काच्या जागी आठवडे बाजाराचे स्थलांतर केले जावे. अशी अपेक्षा सुद्धा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.