Headlines

जय बाबाजी परिवारातर्फे अयोध्येत 1100 भाविकांचे 2 तास श्रमदान:100 पेक्षा जास्त गाेण्या कचरा संकलन करत स्वच्छता मोहीम‎




श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित वार्षिक ‘ॐ जगदगुरू जनशांती धर्म सोहळ्यात अध्यात्माबरोबरच समाजात श्रमसंस्कार रुजविण्याच्या उद्देशाने महाश्रमदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. भक्त परिवारातील ११०० भाविकांनी २ तास श्रमदान करत १०० गोण्या कचरा संकलीत करण्यात आला. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित धर्म सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप यांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.याच सोहळ्या दरम्यान जगदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या आदेशाने भक्त परिवारातील हजारो भाविकांनी अयोध्या येथील विविध भागात व शरयू नदीच्या तीरावर एकत्र येऊन सामुहिक श्रमदान केले. शरयू नदी परिसर स्वच्छता, कचरा संकलन आणि विविध लोकोपयोगी कामांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाश्रमदान केले. एकाचवेळी हजारो भाविकांच्या सहभागामुळे परिसरात स्वच्छता आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण झाला. सव्वा कोटी तास श्रमदान करण्याचा महासंकल्पही दृढ ‘श्रमेव जयते’ या जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेनुसार देशभरात एकूण सव्वा कोटी (१.२५ कोटी) तास श्रमदान करण्याचा महासंकल्पही दृढ करण्यात आला. या अभियानांतर्गत गावोगावी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी दिलेला “जो करील श्रमदान, त्यासी घडेल चारीधाम’ हा महामंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरवत जय बाबाजी भक्त परिवाराने अयोध्यानगरीत श्रमसंस्काराचा आदर्श घालून दिला. अध्यात्म आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित भाविक व अयोध्या येथील नागरिकांनी कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *