Headlines

फुलांचे दर वधारले; मोगरा ८०० रुपये किलो:लग्नसराईमुळे दरात तिप्पट वाढ; वाढत्या उन्हाचाही बसतोय फटका‎




प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात सध्या फुलांचे दर वधारले असून, लग्नसराई, सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. विशेषतः गुलाब आणि मोगरा या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने त्यांच्या किमतींमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. लग्नसराई आणि उन्हाळा लागण्यापूर्वी २०० ते ३०० रुपये किलो दर असलेल्या मोगरा ८०० रुपये तर १५० ते २०० रुपये किलो असलेल्या गुलाबाच्या फुलांचे दर ६०० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे फुलांचे दर सुमारे २५ टक्क्यांनी वधारले आहेत. ताज्या फुलांच्या कमतरतेमुळे हार आणि बुकेचे दरही वाढले आहेत. बाजारात झेंडू समवेत इतर सर्व फुलांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे भाव चांगलेच वधारले आहेत. सध्या गुलाबाची फुले सुमारे ६०० रुपये तर, मोगरा ८०० ते ९०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. याशिवाय इतर फुलांच्याही दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत फुलांचे भाव तिपटीने वाढल्याचे शहरातील गोरक्षण रोडवरील विक्रेते दीपक घावडे यांनी सांगितले. या दरवाढीमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असला, तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी फुलांची खरेदी महागडी ठरत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारात फुलांची आवक कमी झाली असून, त्याचवेळी मागणी वाढल्याने दर वधारल्याचे चित्र आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने तसेच विविध धार्मिक बाजारातील विविध फुलांचे दर (प्रतिकिलो) फुलांचा प्रकार दर गुलाब ६०० मोगरा ८०० झेंडू १०० लिली १०० पांढरी शेवंती २५० निळी शेवंती ३०० अॅस्टर ३००० मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीमुळे दरवाढ बाजारात झेंडू समवेत इतर सर्व फुलांची कमतरता जाणवत आहे त्यामुळे भाव चांगलेच वधारले आहेत. सध्या लग्नसराई आणि सण-उत्सवांमुळे फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारात आवक कमी पडत असल्याने दर वाढले आहेत. रोजच्या तुलनेत खरेदी जास्त होत आहे. ही दरवाढ संपूर्ण मे महिना राहण्याचा अंदाज आहे. – मधुकर ताटे, फूल विक्रेता, गोरक्षण रोड.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *