Headlines

21 हजार पाणीपुरींपासून साकारला 13 फूटी गणपती:गणेश भेळचा अनोखा उपक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश




पुण्यात गणेश भेळने यंदा अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यांनी 21 हजार पाणीपुरीच्या पुऱ्या वापरून 13 फूट उंच आणि 10 फूट रुंद गणपतीची मूर्ती साकारली आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गणेश भेळच्या दालनाबाहेर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. यावेळी त्यांच्या पत्नी छाया गुडमेवार, संचालक रुपेश गुडमेवार, दिनेश गुडमेवार आणि अनुष्का गुडमेवार उपस्थित होते. मूर्तीवरील पुऱ्या १२ दिवस टिकून राहाव्यात यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशा प्रकारे गणपती साकारण्याचा गणेश भेळचा हा चौथा प्रयत्न आहे. दरवर्षी ते वेगळी संकल्पना घेऊन येतात. ही मूर्ती बनवण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. सर्व पुऱ्या त्यांच्या कारखान्यात तयार करण्यात आल्या. कलाकार प्रशांत साळुंखे यांनी ही मूर्ती प्रत्यक्षात साकारली आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना गणेश भेळचे संचालक रुपेश गुडमेवार म्हणाले की, नागरिकांच्या प्रतिसादामुळे त्यांना असे काही करण्याची प्रेरणा मिळते. या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुऱ्या बनवताना उरलेल्या पिठाचा पुनर्वापर करण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या संरचनेसाठी बांबू आणि कागदासारख्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. पुनर्वापर आणि कल्पकतेतून पर्यावरणाचा संदेश देण्याचा हा गणेश भेळचा प्रयत्न आहे. संचालक दिनेश गुडमेवार यांनी सांगितले की, ‘गणेश’ हे नाव त्यांच्या व्यवसायाचे नाव नसून त्यांच्या आयुष्याशी जोडलेले नाते आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक पाणीपुरीची पुरी म्हणजे फक्त एक पुरी नव्हती, तर त्यात त्यांना ‘गणेश’ दिसत होता. 1978 मध्ये रमेश गुडमेवार आणि छाया रमेश गुडमेवार यांनी पुण्यात एका साध्या हातगाडीपासून गणेश भेळची सुरुवात केली. अस्सल चव, उत्तम गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान या मूल्यांवर हा व्यवसाय सुरू झाला. आज गणेश भेळ पुण्याच्या खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँड बनला आहे. सध्या गणेश भेळच्या 35 हून अधिक शाखा आहेत आणि त्यांचा माल 22 देशांमध्ये निर्यात केला जातो. आई-वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा ते पुढे नेत असून, आधुनिक व्यवस्थापन, गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण विचारांनी ब्रँडचा विस्तार करत आहेत. हेही वाचा.. गणेश चतुर्थी आज, स्थापनेसाठी दिवसभरात 5 मुहूर्त:घरात बसलेले गणेश आणि ऑफिस, दुकान, कारखान्यांसाठी उभे गणपती शुभ आज म्हणजे 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होईल. या दिवशी गणपती स्थापनेसाठी दिवसभरात 5 शुभ मुहूर्त आहेत. ग्रंथांमध्ये घरगुती पूजेसाठी मातीच्या लहान गणेश मूर्तीचे विधान मिळते. मूर्ती स्थापित केल्यानंतर दररोज सकाळी-संध्याकाळी दिवा, दुर्वा, फुले आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करण्याची परंपरा आहे. गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे टाळण्याचे विधानही आहे. गणेशोत्सवाचे मुख्य विसर्जन अनंत चतुर्दशी, 25 सप्टेंबर रोजी होईल. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *