![]()
अमरावती येथे बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या बॅनरखाली कामगारांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. बंद केलेल्या कामगार कल्याणकारी योजना पुन्हा सुरु कराव्यात, अशी त्यांची मागणी होती. हा मोर्चा सोमवार, २८ सप्टेंबर रोजी काढण्यात आला. ‘आयटक’च्या बांधकाम कामगार महासंघाचे अध्यक्ष संजय मंडवधरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सरकारने कामगारांच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, घरकुलाचा लाभ, विवाहासाठीचे ३० हजार अनुदान, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजाराची मदत, अत्यावश्यक वस्तू आणि सुरक्षा संच यांसारख्या योजना बंद केल्या आहेत. नूतनीकरण आणि नवीन नोंदणीसाठी वर्षभरानंतरची तारीख दिली जाते. तसेच, योजनांच्या लाभासाठी केलेल्या अर्जांवरही लवकर निर्णय होत नाही, अशा अनेक अडचणी कामगारांनी मांडल्या. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
Source link
बंद केलेल्या योजना सुरु करण्यासाठी बांधकाम कामगारांचा कलेक्ट्रेटवर मोर्चा:शिष्यवृत्ती, घरकुल, विवाह अनुदान बंद झाल्याने कामगार संतप्त, सरकारला निवेदन