![]()
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची आगामी विधानपरिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने लढवावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) महाराष्ट्रकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. NSUI महारा
.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार असून 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
मित्रपक्षांना संधी दिल्यानंतर आता काँग्रेसने लढावे
पत्रात म्हटले आहे की, मागील अनेक विधानपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडीतील तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी दिली. आघाडीधर्माचे पालन करत काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी पक्षाच्या निर्णयाचा आदर करून मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम केले.
मात्र, सातत्याने मित्रपक्षांना संधी दिल्यानंतर आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने स्वतःचा उमेदवार उभा करून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे खंडाळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
पदवीधर, विद्यार्थी आणि युवकांमध्ये संघटनात्मक संपर्क
काँग्रेसचा या मतदारसंघात दीर्घकाळापासून संघटनात्मक संपर्क असल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. पदवीधर, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, युवक तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे पक्षाने या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारल्यास कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाने काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल, असे पत्रात म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करण्याची मागणी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसने लढवावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महाविकास आघाडीतील संबंधित पक्षांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी NSUIने केली आहे.
हा निर्णय केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित न राहता मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास ठेवण्याचा संदेश देईल आणि आगामी काळात अधिक जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळेल, असेही खंडाळे यांनी पत्रात म्हटले आहे.