Headlines

मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानांचा फोटो हटवला:महिनाभरानंतर कार्यालय उघडलं, टेबलवर संविधानाची प्रत ठेवली




मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल महिनाभर कार्यालय बंद ठेवल्यानंतर शान-ए-हिंद यांनी अखेर आपले उपमहापौर दालन उघडले. कार्यालय उघडल्यानंतर दालनातील टिपू सुलतान यांचा फोटो हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, फोटो हटवल्यानंतरही हा वाद संपलेला नसून त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई सुरू असल्याचे शान-ए-हिंद यांनी स्पष्ट केले. मालेगाव महापालिका निवडणुकीनंतर शहरातील सत्तासमीकरणामुळे महापालिका राज्याच्या राजकीय चर्चेत आली होती. त्यानंतर उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले. भाजपच्या नगरसेवकांनी या फोटोला आक्षेप घेत विरोध दर्शवला होता. यापूर्वीही फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने हा मुद्दा अधिक चर्चेत आला. सण-उत्सवाच्या काळात वाद टाळण्यासाठी कार्यालय बंद या पार्श्वभूमीवर शान-ए-हिंद यांनी जवळपास महिनाभर आपले कार्यालय न उघडण्याचा निर्णय घेतला होता. सण आणि उत्सवाच्या काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये आणि अनावश्यक वाद निर्माण होऊ नये, यासाठी कार्यालय बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महिनाभरानंतर त्यांनी दालन उघडल्यानंतर त्यातील टिपू सुलतान यांचा फोटो तेथे नसल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून लेखी सूचना मिळाल्यानंतर फोटो हटवण्यात आल्याचे शान-ए-हिंद यांनी स्पष्ट केले. टिपू सुलतानांच्या फोटोऐवजी टेबलवर संविधान दालनातून टिपू सुलतान यांचा फोटो हटवला असला, तरी शान-ए-हिंद यांनी आपल्या टेबलवर संविधानाची मूळ प्रत ठेवली आहे. ही प्रत काचेच्या बॉक्समध्ये फ्रेम करून ठेवण्यात आली आहे. या संविधानाच्या मुखपृष्ठावर राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दालनात विविध महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यासोबत साथी निहाल अहमद, अबू आझमी आणि अखिलेश यादव यांचे फोटोही दालनात असल्याची माहिती समोर आली आहे. शान-ए-हिंद यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाच्या लेखी सूचनेनुसार टिपू सुलतान यांचा स्वतंत्र फोटो हटवण्यात आला आहे. मात्र, संविधानाची मूळ प्रत दालनात ठेवण्यात आली आहे. फोटोवरून वाद; प्रकरण उच्च न्यायालयात टिपू सुलतान यांचा फोटो उपमहापौरांच्या दालनात लावता येतो किंवा नाही, याबाबतचा प्रश्न आता न्यायालयात पोहोचला आहे. शान-ए-हिंद यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले. या याचिकेवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. या प्रकरणात राज्य सरकार, पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून लेखी उत्तर मागवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे दालनातील फोटोचा मुद्दा केवळ राजकीय वादापुरता मर्यादित न राहता आता न्यायालयीन प्रक्रियेत गेला आहे. संविधानाला विरोध केल्यास पोलिसांत जाण्याचा इशारा दरम्यान, प्रसिद्धीसाठी या मुद्द्यावरून स्टंट करणाऱ्यांनी आता संविधानालाही विरोध केल्यास आपण पोलिसांत तक्रार करू, असा इशारा शान-ए-हिंद यांनी दिला. त्यामुळे दालनातील फोटोचा वाद पुढील काळात पुन्हा तापण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाच्या सूचनेनुसार टिपू सुलतान यांचा स्वतंत्र फोटो हटवण्यात आला असला, तरी त्यासंदर्भातील उच्च न्यायालयातील याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. सामूहिक अत्याचार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवारांच्या अडचणी वाढल्या:भिवंडी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष भिवंडी तालुक्यातील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयाकडून धक्का बसला आहे. भिवंडी सत्र न्यायालयाने नरेंद्र पवार यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे नरेंद्र पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्यासह बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नरेंद्र पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *