Headlines

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपाची बैठक:पशू शल्यचिकित्सकांसह, पोलिस विभागानेही घेतला सहभाग : सहकार्य करण्याचे आवाहन‎




आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गोवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात महानगरपालिकेत तातडीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे, सहाय्यक आयुक्त डॉ. पुरुषोत्तम सोळंके, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, राजापेठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण वांगे, खोलापुरी गेटचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक हनुमंत उरलागोंडावार, गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक कोटनाके, राजापेठचे पोलीस निरीक्षक उमेश मुंढे, बडनेराचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, विविध विभागांचे अधिकारी, स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, संबंधित पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते. बकरी ईद निमित्त कुरबानीसाठी जनावरांची वाहतूक करताना वाहनांमधून रक्त, मांस अथवा जनावरांचे अवशेष रस्त्यावर पडून अस्वच्छता निर्माण होणार नाही. यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या. अशा प्रकारामुळे शहरातील स्वच्छतेवर परिणाम होऊ नये. नागरिकांच्या आरोग्यास कोणताही धोका निर्माण होऊ नये. यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छता, आरोग्यावर विशेष भर देण्याचे निर्देश बकरी ईद सणाच्या कालावधीत शहरात कोणतीही गैरसोय होऊ नये. नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी २७ ते २९ मे या कालावधीत विविध संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची विशेष नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *