![]()
छत्रपती संभाजीनगर ते पैठण या महामार्गाचेकाम कोट्यवधी रुपये खर्च करून संथगतीनेसुरू असल्याचा आरोप होत असतानाच,बिडकीन येथील साई मंदिरासमोरील नव्यानेबांधलेल्या पुलाच्या बाजूचा रस्ता आणिसिमेंटचा मोठा भराव बुधवारी अचानकखचला. आधी हळूहळू माती सरकली आणिनंतर भराव खाली कोसळला. हे दृश्यनागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केले असून त्याचेव्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफइंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाअसता, त्यांनी संभाजीनगर शहरालापाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीच्या कामावर खापर फोडले. पावसाळ्याआधी हेकाम पूर्ण करण्याच्या सूचना देऊनही जीवन प्राधिकरणाने उशीर केला. पावसामुळे मातीसरकून रस्ता खचला, असा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला. दुसरीकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फोन नउचलल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.रस्ता खचल्यामुळे बिडकीन ग्रामपंचायतीची जलवाहिनी फुटून गावाचा पाणीपुरवठा ठप्पझाला. अधिकारी व ठेकेदारांच्यानिष्काळजीपणाची किंमत ग्रामस्थांना मोजावीलागत आहे.
Source link
बिडकीनला वापर सुरू होण्यापूर्वीच नवा पूल खचला:महामार्ग प्राधिकरणाने संभाजीनगरच्या नवीन जलवाहिनीवर फोडले खापर, पाणीपुरवठा विस्कळीत