Headlines

बेदाण्यासह शेतकऱ्यांच्या स्वप्नांचाही चिखल:मुंगशी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 7 ते 8 टन बेदाणा मातीमोल‎




बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, हातातोंडाशी आलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या द्राक्ष बागेवर एका क्षणात पाणी फेरले गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. मुंगशी येथील शेतकरी अर्जुन श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वीच जालिंदर राऊत यांच्या शेडवर आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी टाकला होता. मात्र, अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट आणि कागद फाडून टाकले. जोराच्या पावसामुळे शेडवर असलेला अंदाजे ७ ते ८ टन बेदाणा भिजल्याने त्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. द्राक्ष बागेसाठी महागडी औषधे, खते आणि मजुरीवर केलेला अमाप खर्च आता वाया गेला आहे. काही शेतकऱ्यांचे पीक अजूनही झाडावरच आहे, तर काहींनी माल शेडवर वाळत घातला होता. या अस्मानी संकटामुळे उत्पादनाऐवजी कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अवकाळीच्या फटक्याने केवळ पिकांचेच नव्हे, तर शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. आता प्रशासन कधी धावून येणार, याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. ^वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने त्वरित मदत करणे आवश्यक आहे.” अजय क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मुंगशी ^अफाट झालेला खर्च आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच या वादळी पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान केले आहे.” अर्जुन क्षीरसागर, नुकसानग्रस्त शेतकरी, मुंगशी त्वरित मदत करावे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *