![]()
धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजीवनी राहुल वराडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती धुळ्यातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली. गत काही दिवसांपासून धुळ्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या अनेक घटना घडल्यात. या सर्व घटना आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याच्या आहेत. पण संजीवनी वराडेची घटना काही औरच आहे. ती अक्षरशः एखाद्या अदृश्य शक्तीने हात धरून ओढत न्यावे, अशा पद्धतीने हवेत हात वर करून कुठेतरी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालकवर्गांत एकच दहशत पसरली आहे. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात संजीवनी घराबाहेर उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती तिच्यासमोरून जातो. हा व्यक्ती गेल्यानंतर दुसऱ्याच क्षणी संजीवनी शुद्ध हरपल्यासारखी चालू लागते. चालताना तिचा हात कुणीतरी खेचल्यासारखे वाटत आहे. कारण, संजीवनी पुढे जात असताना आपला हात कुणाच्या तरी हातात देऊन चालताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीत तो व्यक्ती दिसत नाही. पण संजीवनीचा हात हवेत अधांतरी तरंगत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ती गुंगीत किवा झोपेत असल्याचे भासते. नेमके काय घडले? सर्वचजण चक्रावले दुसरीकडे, संजीवनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पण ती अद्याप सापडली नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या विचित्र घटनेमुळे सर्वचजण चक्रावेल आहेत. अखेरीस संजीवनी गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही प्रत्यक्षदर्शी व व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते, संजीवनीचे संमोहनाच्या मदतीने अपहरण केले जाण्याची शक्यता आहे. संजीवनी शुद्धीत नसून, तिला कुणीतरी अशा पद्धतीने नेल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. संजीवनी एखाद्या खोल विचारात असताना घराबाहेर पडली असावी व त्याच स्थितीत ती कुठेतरी गेली असावी, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. हे ही वाचा… एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; ‘जोधा’ काल्पनिक असल्याचा दावा
अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
Source link
अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना