Headlines

बेलापूर-परळी रेल्वेसाठीचे‎‎उपोषण केले स्थगित:‎आमदार विठ्ठलराव लंघे यांची मध्यस्थी ठरली यशस्वी




बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी मिळावी आणि प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये रेल्वे कृती समितीचे रितेश भंडारी, रज्जाक इनामदार, गोवर्धन म्हस्के, नितीन निकम, मन्सूर पटेल यांचा समावेश होता. उपोषणार्थी बेलापूर-परळी रेल्वे मार्ग सुरू करण्याकामी त्यांनी वेळीवेळी हे आंदोलन हाती घेतलेले आहे. मात्र मुंबई मंत्रालयासमोर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर आ. लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वरील आंदोलनाची माहिती दिली यावर लवकरच वेळ देतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आ. लंघे यांना दिले. याबाबत आमदार लंघे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा चर्चा करून येत्या पंधरा दिवसात या बैठकीचे नियोजन करू असे आश्वासन दिले. याबाबत त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा केली असून तातडीने बैठकीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *