Headlines

विद्यार्थ्यांनी नियोजन अन् ध्येय निश्चित करत गरुडभरारी घ्यावी:महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी जीवनाचा "टर्निंग पॉइंट'', विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. अचूक नियोजन केल्यास कोणत्याही शाखेचा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. आपली ध्येय निश्चित करून गरुडासारखी उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन बाबासाहेब कावले यांनी केले. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकरावी प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वखरे होते. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य देवेंद्र मेरड, प्राचार्या अंजली चिंतामण, पर्यवेक्षक पोपट खताळ, प्रा.राहुल गायके, प्रा.सचिन गाडे, प्रा. बाळासाहेब दिंडे, प्रा.सचिन कमानदार, प्रा. रीना हांडे, प्रा.निलोफर शेख, बाळकृष्ण ठोंबळ, प्रा.रामेश्वर तांबे, रामदास पांढरे, गणेश लबडे, दीपक बोडखे, आदिनाथ काटे, ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते. प्राचार्या चिंतामण म्हणाल्या, ध्येय निश्चित करून त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. तसेच वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यासापासून कोणीही रोखू शकत नाही. प्रा. सचिन कमानदार म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्याचा अचूक अंदाज घेतल्यास जीवनात यशस्वी होणे शक्य आहे. तुमच्या भविष्याची दिशा ठरविण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण महत्वपूर्ण आहे. उच्च ध्येय ठेवून संस्कारशील व्हा असा सल्लाही त्यांनी दिला. ज्ञानेश्वरी ठोंबळ हीने आपल्या मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनवैष्णवी मुंगसे हीने केले. प्रास्ताविक आरती गहाळ हीने तर आभार सगुना बोरुडे हीने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जबाबदारी घ्यायला शिकावे ध्येय निश्चित करून त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे. तसेच वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यासापासून कोणीही रोखू शकत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *