![]()
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि नागपूर येथे मतदान पार पडले. दोन्ही मतदारसंघांत लोकप्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावल्याने तब्बल १०० टक्के मतदानाची नोंद झाली. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या जागांवर यापूर्वीच अविरोध निवड झाल्याने, संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूर आणि भंडारा-गोंदियाच्या लढतीकडे लागले होते. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) आणि मुस्लिम लीगच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत ‘तटस्थ’ राहण्याची भूमिका घेतली. नागपुरात १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागपूर शहर ११ आणि उमरेड, कामठी येथील प्रत्येकी एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत सुमारे ९८.४४ टक्के मतदान झाले. भाजपातर्फे राजीव पोतदार आणि इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे अतुल लोंढे हे दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण ८३६ मतदारांपैकी ४१९ पुरुष मतदार तर ४१७ महिला मतदार होत्या. मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी होणार आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात ४ मतदान केंद्रांवर ४५७ पैकी सर्व ४५७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथे एकाही लोकप्रतिनिधीने मतदान सोडले नाही, त्यामुळे १०० टक्के मतदान झाले. या निवडणुकीत महायुतीतर्फे (भाजप) अविनाश ब्राह्मणकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे प्रफुल अग्रवाल हे उमेदवार रिंगणात होते. भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी एकूण ४५७ मतदार होते, ज्यात २२४ पुरुष मतदार आणि २३३ महिला मतदार होत्या.
Source link
भंडारा-गोंदिया, नागपुरात विधान परिषदेसाठी 100% मतदान:नागपुरात एमआयएम, मुस्लिम लीग तटस्थ; 22 जूनला मतमोजणी