Headlines

भक्तिमय मोहीम:मनमाड रायडर्सची 3 दिवसांत नाशिक ते पंढरपूर 380 किमी सायकल वारी




मनमाड सायकलिस्टने १० ते १२ जुलै या कालावधीत ‌‘रॉयल रायडर्स‌’ व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सोबतीने नाशिक ते पंढरपूर अशी ३८० किलोमीटरची सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली. वारीला १० जुलै रोजी सकाळी ५:३० वाजता नाशिक येथे‌ ‘फ्लॅग ऑफ‌’ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिन्नर घाट हे मोठे आव्हान होते. जिद्दीच्या बळावर घाट पार करत रायडर्स वारीत सहभागी झाले. राहुरी येथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर राहुरी ते अहिल्यानगर हा खडबडीत रस्त्यामुळे सर्वात कठीण टप्पा पार करून सायंकाळी अहिल्यानगर येथे मुक्काम करण्यात आला. घाट चढून विठ्ठलाची मूर्ती दिसताच सर्वांचा थकवा क्षणार्धात नाहीसा झाला. ११ जुलै रोजी पहाटे अहिल्यानगरहून निघालेल्या वारीने १६० किलोमीटरचा प्रवास करत टेंभुर्णी येथे मुक्काम केला. ज्ञानबा-तुकाराम आणि विठ्ठल-विठ्ठल च्या जयघोषात आणि रस्त्यात भेटणाऱ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाने हा कठीण टप्पा सहज पार पडला. १२ जुलै रोजी सकाळी टेंभुर्णीहून निघून पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होताच ३ दिवसांचा सर्व थकवा नाहीसा झाला. महाराष्ट्रातून आलेल्या सायकल वारकऱ्यांचे भव्यदिव्य सायकल रिंगण बघून डोळ्याचे पारणे फिटले. विठूच्या दर्शनाने सर्व सायकलस्वार धन्य झाले. या सायकल वारीत छत्रे विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रवीण व्यवहारे सिद्धी क्लासेसचे संचालक डॉ. भागवत दराडे, युवा उद्योजक गणेश वाहले, संगीता कदम, सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. योगेश मगर, डॉ. नीलेश हारदे या मनमाडच्या सायकलिस्टने ही खडतर मोहीम केवळ जिद्दीच्या जोरावर पार पाडली. वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर अंतर्मनाचा प्रवास वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर तो अंतर्मनाचा प्रवास आहे. पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची भक्ती पाहून आम्हाला खरी प्रेरणा मिळाली. विठ्ठलाच्या ओढीमुळे कठीण वाटलेला प्रवासही आनंददायी झाला. ही वारी केवळ एक सायकल वारी मोहीम नसून, शिस्त, आरोग्य आणि भक्ती यांचा मिलाफ असलेली ‌‘आनंदवारी‌’ ठरली, अशी भावना सहभागी सायकलिस्टनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *