![]()
ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरवर्षी २५० कोटींचा विकास निधी देण्याचेही कबूल केले आहे. हे सर्वजण केवळ पैशासाठीच गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय भाजपचापाठिंबा आहे. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसहे शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रातील भाजप आणि राज्यातीलभाजप यांच्यात शीतयुद्ध आहे, असा आरोपआमदार रोहित पवार यांनी धाराशिव येथील पत्रपरिषदेत केला. आमदार रोहित पवारांनी यापूर्वी अजितपवार यांच्या बंडाबाबत व्यक्त केलेले अंदाजखरे ठरले होते. त्यामुळे आता त्यांनीखासदारांना मिळालेल्या ६० ते ९० कोटींच्यारकमेचा दावा केल्याने राजकीय वर्तुळातखळबळ उडाली आहे. दोन भावांच्या राजकारणात
जिल्हा गरीब राहिल्याची टीका खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीचपूर्ण आर्थिक बळ लावल्याचे ते म्हणाले.धाराशिवला मी मारल्यासारखे करतो, तूरडल्यासारखे कर, असे दोन भावांचे राजकारण सुरू आहे. या राजकारणात दोन परिवार मोठे झाले, मात्र जिल्हा गरीबचरा हिला, अशी बोचरी टीका त्यांनी नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार जगजितसिंह पाटील यांच्यावर केली.
Source link
भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा