![]()
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी 2026 साठीच्या नव्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या कार्यकारिणीत एकूण 29 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत 10 उपाध्यक्ष, 4 महामंत्री आणि 8 सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कोषाध्यक्ष, सोशल मीडिया प्रमुख आणि युवती प्रमुख अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत. 35 वर्षांखालील तरुणांना संधी भाजपच्या नव्या युवा मोर्चा कार्यकारिणीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व 29 पदाधिकारी हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे पक्षाने युवा संघटनेत नव्या आणि तरुण नेतृत्वाला मोठी संधी दिल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील तरुण मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवणे, युवकांशी संबंधित प्रश्नांवर काम करणे आणि संघटना मजबूत करणे, अशी जबाबदारी या पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. शंभवी साळेंकडे युवती प्रमुखपद नांदेडच्या 28 वर्षीय शंभवी साळे यांच्यावर युवती प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा मोर्चातील हे महत्त्वाचे पद मानले जाते. राज्यातील युवतींचे संघटन वाढवणे, तरुणींचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून मांडणे आणि अधिकाधिक युवतींना संघटनेशी जोडण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. सर्व विभागांना प्रतिनिधित्व नव्या प्रदेश कार्यकारिणीत महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुणांना संधी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीत विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपची तयारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा मोर्चाची ही नवी टीम महत्त्वाची ठरणार आहे. तरुण मतदारांशी संपर्क वाढवणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळात पोहोचवण्याचे काम या टीमकडून केले जाणार आहे. प्रदेश कार्यकारिणीनंतर आता जिल्हा आणि तालुका पातळीवरील युवा मोर्चाच्या संघटनात्मक बदलांकडे लक्ष लागले आहे. नव्या तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात युवा मोर्चाची संघटना अधिक मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे या नियुक्त्यांवरून स्पष्ट होत आहे. हेही वाचा… दुष्काळाच्या सावटात मुंबईत रस्ते धुण्यासाठी 8 कोटींचे कंत्राट:पाणीकपात असताना लाखो लिटर पाण्याच्या वापरावर प्रश्नचिन्ह राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये जलसंकटाची चिंता वाढली असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्ते पाण्याने धुण्यासाठी तब्बल 8 कोटी 25 लाख 33 हजार 48 रुपयांचे कंत्राट प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. सविस्तर वाचा….
Source link
भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर:29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, शंभवी साळेकडे युवती प्रमुखपदाची जबाबदारी