Headlines

एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट:तासभर चर्चा, दुष्काळावरही झाली चर्चा




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आगामी विधान परिषद निवडणुका, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसेच संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीतील चर्चेचा प्रमुख विषय महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांची परिस्थिती असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘शेतकरी संकटात आहे, राज्य आणि केंद्र सरकार पाठीशी’ एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती घेतली. शेतकरी संकटात असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती मदत केली जाईल, अशी भूमिका या भेटीतून स्पष्ट झाली. केंद्राचे पथक दुष्काळाची पाहणी करणार महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक राज्यात येणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. हे संकट मोठे असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही महाराष्ट्रावर संकटे आली असताना राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम केले आहे. यावेळीही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन्ही सरकारे आवश्यक ती पावले उचलतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही’ दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘पाण्याचा प्रश्न आणि चाराप्रश्नी पंतप्रधानांनी माहिती घेतली,’ असेही शिंदे यांनी सांगितले. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान या बाबींवर पंतप्रधान मोदी यांनी माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार’ शेतकऱ्यांना मदत करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी, ‘सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे,’ असे म्हटले. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून आवश्यक निर्णय घेतले जातील, असे संकेत त्यांनी दिले. हेही वाचा…. दुष्काळाच्या सावटात मुंबईत रस्ते धुण्यासाठी 8 कोटींचे कंत्राट:पाणीकपात असताना लाखो लिटर पाण्याच्या वापरावर प्रश्नचिन्ह राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये जलसंकटाची चिंता वाढली असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्ते पाण्याने धुण्यासाठी तब्बल 8 कोटी 25 लाख 33 हजार 48 रुपयांचे कंत्राट प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *