Headlines

भाम धरण घाटमाथ्यावरील ‘सुनाकडा' धबधबा रौद्ररुपात




तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या घाटमाथ्यावरील प्रसिद्ध सुनाकडा धबधबा जोरदार प्रवाहित झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याने रौद्र रूप धारण केले असून, त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. रस्त्याच्या कडेला आणि सुनसान परिसरात असलेल्या या धबधब्याला स्थानिकांनी ‘सुनाकडा’ हे नाव दिले आहे. सध्या पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याने धबधबा अधिकच आकर्षक दिसत आहे. ( छाया : संदीप कोतकर ) सध्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धबधब्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, धबधब्याच्या प्रवाहात जाणे धोकेदायक आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना धबधब्याजवळ सेल्फी काढणे, पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घोटीपासून ८ किलामिटर अंतरावर हा धबधबा आहे. घोटीवरून काळूस्ते मार्गे भाम धरणावर पोहोचावे. त्यानंतर भाम धरणापासून मांजरगावकडे जाणाऱ्या मार्गावर ८०० मीटरावर हा धबधबा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *