![]()
हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ता. 9 पहाटे अवघ्या दोन तासात चार भूकंपाच्या धक्याने जिल्हा हादरला असून शिरळी परिसरात 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून शिरली (ता. वसमत) हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून खोली 10 किलोमिटर आहे. त्यानंतर दुसरा धक्का 2.15 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल, 2 वाजून 17 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केल, तर 3 वाजून 23 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असूनत त्याचे केंद्रबिंदू काकडदाभा (औंढा नागनाथ) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूकंपाचे धक्के वसमत, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात अधिक तिव्रतेने जाणवले आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून 10 ते 12 घरांना तडे गेले आहेत. तसेच पांगरा शिंदे गावात 50 ते 60 घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये- गुप्ता हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असून स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊन नये आपत्कालीन परिस्थिती किंवा नुकसान आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनीही समाजात भितीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमातून पोस्ट करू नये.
Source link
भूकंपाच्या सलग 4 धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला:शिरली परिसरात 4.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे नागरिकांची रात्र जागून, अनेक घरांना तडे