Headlines

भोकणी ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरावर गौरव:सरपंच अरुण वाघ व ग्रामपंचायत अधिकारी राहणे‎ यांना सन्मानपत्र




मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भोकणी ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण गोविंद वाघ व ग्रामपंचायत अधिकारी योगेश रामदास राहणे यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्यात सन्मान करण्यात आला. गावाच्या विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, लोकसहभागातून राबवलेले उपक्रम आणि विकासकामांतील प्रशासकीय समन्वयाची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला. बुधवारी (दि. ४) नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक सोमनाथशेठ सांगळे व कांताराम कुऱ्हाडे उपस्थित होते. भोकणी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या प्रक्रियेत पारंपरिक कामांसोबतच नावीन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि स्थानिक विकासाच्या विविध संधींना प्राधान्य दिले आहे. ग्रामविकास ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा पदाची जबाबदारी नसून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नांतून साकार होणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची जिल्हास्तरावर दखल घेतली जाणे समाधानकारक असून, भविष्यात अधिक प्रभावी काम करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सन्मान ही केवळ आजवरच्या कामाची पोचपावती नसून, उद्याच्या अधिक चांगल्या कामाची जबाबदारीही असते. भोकणीच्या विकासप्रवासात हा गौरव नवी ऊर्जा देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे. – अरुण वाघ, सरपंच, ग्रामपंचायत भोकणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *