Headlines

मयत बस वाहकाच्या वारसांना 71 लाखांची नुकसान भरपाई:अपघातग्रस्त कुटुंबाला लोकन्यायालयात मिळाला दिलासा




सांगोल्याच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बस वाहक आनंदा माळी यांच्या परिवारास तब्बल ७१ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. सोलापूर जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या या प्रकरणाचा निकाल लागला असून, तो शनिवारच्या लोकन्यायालयातील सर्वात मोठ्या रकमेचा आणि विशेष लक्षवेधी ठरला.२६ सप्टेंबर २०२५ रोजी एसटी बसचालक आकाश देवगडकर व वाहक माळी हे बस (एमएच ४० वाय ५०३७) घेऊन चडचणवरून सांगोला येथे परत आले होते. बसडेपो प्लॅटफॉर्म क्र. ११ येथे बस लावून डेपोमधून मशीन घेऊन येत असताना, एका भरधाव स्विफ्ट कारने (एमएच ४५ एएल ०३८२) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ॲड. रूपेश महिंद्रकर यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. लोकन्यायालयात झालेल्या सुनावणीत सोलापूरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. शर्मा व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश इंदलकर यांच्या हस्ते माळी परिवारास ७१ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. लोकअदालतमध्ये लाखोंची मदत पीडित कुटुंबाला जलद न्याय बस वाहक आनंदा माळी यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराने न्यायासाठी न्यायालयाची दारं ठोठावली. लोकन्यायालयाच्या माध्यमातून ७१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. हा निकाल पीडित कुटुंबांना जलद व प्रभावी न्याय मिळण्याचे उत्तम उदाहरण आहे. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ॲड. रूपेश महिंद्रकर, माळी परिवाराचे वकील



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *