Headlines

मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा सरकारचा कट!:नेत्यांची पोरं परदेशात, कार्यकर्त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय; पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीलाच जरांगेंचा घणाघात




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथून आपल्या ‘पश्चिम महाराष्ट्र’ दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, यादरम्यान ते विविध जिल्ह्यांत जाऊन समाजाशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर आणि सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “कुणबी नोंदी रद्द करण्याचा कट रचला जातोय” मराठा समाजाच्या कुणबी नोंदींबाबत जरांगे पाटील यांनी एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आणली आहे. ते म्हणाले, “कुणबी नोंदी कमी करण्याचा मोठा कट सध्या रचला जात आहे. मी काल रात्रीच एक नवी माहिती आणि कागदपत्रे काढली आहेत. त्यानुसार, मराठ्यांच्या मिळालेल्या कुणबी नोंदी थेट रद्द करण्यात याव्यात, असे पत्रच काढण्यात आले आहे.” या नव्या दाव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी नेत्यांवर थेट हल्लाबोल भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर टीकास्त्र सोडताना जरांगे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, “या पक्षांमधील जे मोठे नेते आहेत, ते पैशांच्या जोरावर आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवतील. पण, या नेत्यांसाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला आपल्या मुलांची साधी शाळेची फी भरणेही शक्य नाही. गरिबांना त्यांच्या मुलांना परदेशात पाठवता येत नाही, म्हणूनच मी या कार्यकर्त्यांच्या आणि गरिबांच्या लेकरांसाठी लढत आहे.” “मराठ्यांचे वाटोळे होऊ देणार नाही!” समाजाला आवाहन करताना जरांगे यांनी, ‘जातीचे उपकार कधीही विसरायचे नसतात’, अशी आठवण करून दिली. “मी आता मराठ्यांचे वाटोळे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह आता मी मराठवाडा आणि विदर्भातील सर्व ठिकाणी स्वतः दौरे करणार आहे,” असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. हेही वाचा.. निवडणुका जिंकण्याची भाजपची पद्धत ‘फ्रॉड’:राज ठाकरेंचा आरोप, मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावर म्हणाले- उशीर झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्याची सद्यस्थिती, नाशिकमधील खड्डे, ‘नीट’ परीक्षेतील घोळ आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सगळी शहरे बर्बाद होत आहेत, तरीही तुम्ही भाजपच्या लोकांना निवडून देत असाल तर भोगा,” अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांना आणि जनतेला खडेबोल सुनावले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *