Headlines

'मला बदनाम करण्यासाठी 500 कोटींचा घाट का घातला?':मनोज जरांगेंचा संतप्त सवाल; ऑडिओ क्लिप खरीच असल्याचा दावा




मराठा आंदोलन चिरडण्यासाठी आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा घाट का घातला, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. समाजातील तरुणांना ईडी आणि एसआयटीच्या धमक्या देऊन फोडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्य बाहेर काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप ‘एआय’ने बनवलेली नसून ती खरी आहे आणि पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनीही याची दखल घेतली असल्याचे सांगत जरांगे यांनी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले, माझा विषय एवढाच आहे की तुम्ही मला 500 कोटी देण्याचा आणि बदनाम करण्याचा घाट का घातला? तुम्ही आंदोलन दाबण्याचा चिरडण्याचा डाव का रचला? माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही इतके का द्वेषने पेटून उठलात की मराठा समाजाचं आंदोलन बंड पडलं पाहिजे म्हणून 3 वर्षंपासून तुम्ही मोठ मोठाले संकट माझ्या पुढं उभा करत आहात, याचं कारण काय? माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही षड्यंत्र का केलं? पुढे मनोज जरांगे म्हणाले, आमचे लोकं फुटत नसूनही तुम्ही दादागिरीने फोडले, धमक्या देऊन फोडले. महाराष्ट्रातले मराठ्यांचे पोरं इमानदारीने काम करत आहेत, त्यांना ईडीच्या, एसआयटीच्या धमक्या देऊन तुम्हाला बरबाद करतील, तुम्हाला संपवून टाकतील आरामाचं जीवन जगायला शिका, काय असतं त्या मराठ्यात, काय खरं असतं, कोण कोणाचा समाज आहे, हीच वेळी असते संधी साधून सोनं करायची, कोण कोणासाठी येतं, तुम्ही सरकार म्हणतंय तुम्ही त्याच्या विरोधात बोला, नही बोलले तर चौकश्या लागतील. शेवटी दबावापोटी माणसं खचून जातेत. असं करून तुम्ही षड्यंत्र का केलं? तुम्ही इतके टोकाला का गेलात की मी शेतकऱ्यांचा विषय म्हणून याला संपवा. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तुम्ही पार्टी फंड माझ्या विरोधात वापरायला लागलात. तुम्ही हे आंदोलन बदनाम करण्यासाठी नको ते केलं. ती क्लिप ऐकली तर डोकं उजाडेल. किती भयानक कट रचले जातात. तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे हे असं करतात. आता समाजासमोर आले आहे. एकनाथ शिंदे साहेब याच्या मुळाशी जातील मनोज जरांगे म्हणाले, आपले जरी लोकं असतील तरी त्यांना सोडले नाही पाहिजे. मोर्चे काढायला लावायचं, खोट्या बातम्या पसरवल्या, त्याची बदनामी करा म्हणून सांगतात, हे सगळे डाव आखले आहेत त्यात. याचा छडा लागला पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब याच्या मुळात जातील, राजकारण हा नंतरचा भाग आहे. पण ते मुळात जातील आणि राज्याला नवीन संदेश देतील की आमचे जरी असले तरी सोडत नाही. म्हणून मी महिनाभर काहीच बोलणार नाही त्यांना. मी इमानदारीने काम करतो म्हणून माझ्या पावला पावलावर संकट आहे. मी या दुःखातून पायवाट काढत आहे, माझ्या समाजासाठी. माझ्या समाजाच्या लेकरांवर कधी संकट येऊ नये म्हणून मी झटत आहे. माझ्या घरावर सुद्धा ते हल्ला करू शकतात. रामदास कदम यांना काळालं आहे म्हणून त्यांनी धडाधड नावं घेतले, उदय सामंत साहेबांनी नावं घेतले, त्यांना वाटत आहे की हे सत्य आहे. आता दिल्लीच्या वाऱ्या सुरू होऊ शकतात आणि यांच्याच विरोधात राण पेटवायला सुरुवात करतील. मी हा विषय संपूच देणार नाही पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, 500 कोटींचा विषय जर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले नसतील, त्यांच्या मुलाने दिले नसतील तर ते काही शांत बसणार नाहीत. राजकारण गेलं उडत म्हणतील ते आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाहीत. शिंदे साहेब खोट्याला साथ देणार नाहीत. मी हा विषय संपूच देणार नाही. जर प्रगल्भ विचार असणारे पृथ्वीराज बाबा म्हणत असतील की ही ऑडिओ क्लिप खरी आहे तर नक्कीच यात तथ्य आहे. ते कितीही म्हणत असले की ही ऑडिओ क्लिप एआयने बनवली आहे, अशी क्लिप बनवताच येत नाही. राज ठाकरे साहेब यावर बोलले. उद्धव साहेबांचे लोक बोलत आहेत. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. लोकांना कळत आहे की काय चालू आहे. मराठा समाजाची नवी फळी उभी करणार मी सरळ माणूस आहे. छत्रपती शिवरायांना सगळेच सारखे होते. पण फितुरी सुद्धा व्हायची. कोणी शत्रूला जाऊन मिळाला असेल तर सांकेतिक भाषा असायची. आता आपल्यात सुद्धा सच्चा मराठ्यांची घुसमट होत आहे, कोण असेल फुटलेला, असा संशय प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आता नवीन फळी तयार करणार आहे असे मी म्हटले होते. समाजाच्या हितासाठी काम करणारे कोणीही असो, शेतकरी असो, उद्योग क्षेत्रातले असो, कोणीही असो. निस्वार्थपणे काम करणारे लोक पाहिजेत. आपण जे आंदोलन करत आहोत यात जर फितुरी करणारी टोळी असेल तर विश्वासघात होईल आणि पानिपत होईल. त्यामुळे नवीन फळी उभी करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *