Headlines

महसूल मंत्री करणार दुष्काळी पंचनामा प्रक्रियेचा ‘पंचनामा’:बावनकुळे उद्या करणार अकाेला, बाळापूर तालुक्यात पाहणी‎




दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्यात येत असून, शनिवारी ते अकोला व बाळापूर तालुक्यातील पाहणी करणार आहेत. सध्या पीक परिस्थितीचे सरकारी यंत्रणांकडून पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्यासाठी नेमकी टीम फिल्डवर आहे का, खरा पंचनामा होत आहे का, हे बावनकुळे तपासणार आहेत. त्यामुळे संयुक्तपणे पंचनामे करणाऱ्या महसूल, कृषी व ग्राम विकास (पं.स.) संबंधित कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. बावनकुळे शनिवारी अकोल्यात येत आहेत. पंचनामे तसेच विविध विषयांवरील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत ते अकोला आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची निवेदने ते स्वीकारणार आहेत. त्यानंतर येवता येथे शेताच्या बांधावर जाणार आहेत. अहवालाच्या तक्त्यातील या बाबींची होणार तपासणी पंचनामा अहवालासाठी तक्ता तयार करण्यात आले आहे. यात शेतकऱ्याचे नाव, आठ “अ’ नुसार क्षेत्र, बाधित पिकाचे नाव, बाधित क्षेत्र (हेक्टर), नुकसानीची टक्केवारी, फार्मर आयडी, फार्मर आयडी उपलब्ध नसल्यास आधार क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, आयएफसी कोड, बँक खाते क्रमांक नोंदवण्यात येत असून, पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात येत आहे. सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. सोयाबीनची १ लाख ९९ हजार ७९३ हेक्टर (८४ टक्के) पेरणी झाली आहे. आता पाहणी दौऱ्यात पंचनामा प्रक्रियेतील हे तक्ते व्यवस्थित भरण्यात येत आहेत की नाहीत, हे तपासण्यात येणार आहेत. हा अहवाल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार आहे. त्यामुळे पंचनामे महत्त्वाचे आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *