![]()
प्रतिनिधी | कन्नड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानिबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे महापुरुषांचे विचार डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्टेट फायनान्सचे संचालक मिलिंग पाटील यांनी येथे केले. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित महानिबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या स्पर्धेत दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच बहिरगाव जिल्हा परिषद प्रशालेची विद्यार्थिनी वैष्णवी गणेश बनकर ही प्रथम आली असून, ती पाच हजार रुपये किंमतीच्या पुस्तकांची मानकरी ठरली आहे. द्वितीय पुरस्कार कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी प्रकाश निकम हिने पटकावला आहे. या निबंध स्पर्धेत इयत्ता पाचवी ते बारावीचे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना त्रिशरण बुद्ध विहार येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, मुद्रांक जिल्हाधिकारी गोरख सातदिवे, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सागर जाधव, नगराध्यक्ष फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद शेठ, कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, नभाताई ढोकणे, पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव, सचिन भामरे, नगरसेवक विद्या बंटी काशिनंद, युवराज बनकर, तलाठी नितीन मगरे, बाळकृष्ण पगारे, जितेंद्र साठे, राहुल इंगळे, सतीश नाडे, अजय सातदिवे, राहुल डोंगरे, माणिक आबा पगारे, राजेंद्र अवचार, कडूबा पवार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक विनोद अंभोरे यांनी केले. सुत्रसंचलन प्रकाश दाभाडे यांनी केले. आभार अनिल सिरसाठ यांनी मानले. यावेळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करीत उपक्रमाचे कौतूक केले. निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची देण्यात आली भेट स्पर्धेचा विषय भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, स्त्री हक्क व सशक्तीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान असे होते. या स्पर्धेत विजयी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. तृतीय स्पृहा सुहास जवळकर, साने गुरुजी विद्यालय, चतुर्थ तेजल रमेश चव्हाण जिल्हा परिषद प्रशाला, चिकलठाण, प्रतीक्षा योगेश जाधव काशिनाथ पाटील जाधव विद्यालय कन्नड, आरुषी नवनाथ तुपे संत ज्ञानेश्वर विद्यालय कन्नड, शितल भीमराव तुपे श्री रामचंद्र प्राथमिक विद्यालय माळीवाडा, आरक्षण सलीम शेख अजित दादा पवार उर्दू हायस्कूल कन्नड, अर्पिता परमेश्वर आडे जिल्हा परिषद प्रशाला हिवरखेडा गौताळा यांनी पारितोषिक पटकाविले.
Source link
महानिबंध स्पर्धा म्हणजे महापुरुषांचेविचार मनामध्ये रुजवण्याचा उपक्रम:मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन, कन्नडला विजेत्यांचा गौरव