![]()
प्रतिनिधी| खुलताबाद ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची नस असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, आता कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळा येथील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या कामांमुळे केवळ रस्तेच तयार होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार आहे. परिसरात रस्ते चांगले नसल्याने पावसाळ्यात शेतात जाणे किंवा तयार माल बाहेर आणणे हे खुलताबादमधील शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान होते. हे आव्हान ओळखून आमदार बंब यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यातून कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळा या तीन महत्त्वाच्या महसूल मंडळांतील रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी कसाबखेडा मंडळातील बोरगाव वेस ते ऐतिहासिक वेरूळ या शिव रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. येसगाव मंडळातील येसगाव फाटा ते जुना बाजार सावंगी या रस्त्याचे काम होणार आहे. मावसाळा येथील स्मशानभूमी ते मालोदे वस्तीपर्यंतच्या रस्त्याचेही काम होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि तहसीलदार संतोष गुट्टे यांची विशेष उपस्थिती होती. प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत कामाचा दर्जा राखण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस विकास कापसे, जि. प. सदस्या प्रतीक्षा कापसे, रेखाताई चव्हाण, सुनीता खंडागळे, प्रकाश चव्हाण, दिनेश अंभोरे, परसराम बारगळ, योगेश बारगळ, सतीश दांडेकर, अजिम मनियार, मोहन तुपे, संदीप निकम यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हेच आहे आमचे ध्येय : आ. बंब उद्घाटन सोहळ्यात आमदार बंब म्हणाले, “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण दुर्दैवाने त्याला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. पावसाळ्यात चिखलातून खते किंवा आजारी व्यक्तीला खांद्यावरून नेणे हे चित्र मला बदलायचे आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या सन्मानाची लढाई आहे. तालुक्यातील प्रत्येक शिवारातील रस्ता हा पक्का आणि बारमाही चालू शकेल आम्ही बनवणार आहोत.’
Source link
खुलताबादेतील शेतकऱ्यांचा आताचिखलातून जाण्याचा प्रश्न मिटला:कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळ्यात पाणंद रस्त्यांचे आमदार बंब यांच्या हस्ते भूमिपूजन