Headlines

महामानवाला अभिवादन:लासूरगाव येथे कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम-संविधान उद्देशिकेचे वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम‎


.

लासूरगाव (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मंगळवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, लासूरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, लासूरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसह पीएमश्री शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या कवायतीसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या अर्चनाताई आप्पासाहेब शेलार, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब रांहिज, पोलीस पाटील बाबासाहेब हारिचंद्रे, माजी सरपंच वसंतराव हुमे, प्रकाश काळे, जयेश बनकर, रावसाहेब कोटकर, अप्पासाहेब शेलार, तातेराव गोंडे, अशोक सोनवणे, दत्तु साबळे, पीएमश्रीचे मुख्याध्यापक सुरेश राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, लासूरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब रांहिज यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या भारताच्या संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. हे वाटप पंचायत समितीच्या सदस्या अर्चनाताई आप्पासाहेब शेलार यांच्या हस्ते ग्रामस्थांना करण्यात आले. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. रांहिज यांनी आभार मानले.

विहामांडवा येथे स्पर्धा

विहामांडवा | येथील आर.वाय.पी. कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील सामान्य ज्ञान स्पर्धा व आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरील निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी डॉ. संजय शिंदे, डॉ. अजय बढे, प्रा. विकास बेळगे, गणेश करंगळ, दिनेश ससाणे, शरीफ शेख, ओम नवपुते, पूजा डिक्कर, आश्विनी बढे, शुभांगी दहिफळे, मानसी जयस्वाल, श्वेता गंगथीरे, नम्रता मोरे, निकिता सोहळे आदी उपस्थित होते. घाटनांद्रा येथील महाविद्यालय, शाळांत अभिवादन कार्यक्रम घाटनांद्रा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घाटनांद्रा परिसरात मंगळवारी विविध शाळा-महाविद्यालये तसेच ग्रामपंचायत स्तरावर अभिवादनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. या वेळी जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंद्रगडी प्राथमिक शाळा, जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय, नॅशनल मराठी-उर्दू शाळा तसेच मुर्डेश्वर महिला महाविद्यालय, ग्रामसंसद कार्यालय, जय भीम नगर येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी माजी सरपंच यासीन तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, सुनील निकम, अशोक गुळवे, शिवाजी चंदनशिवे, ग्रामसेवक प्रभाकर धुड, कृष्णा मोरे, शेख इब्राहिम, कचरू मोरे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *