Headlines

कात्रज हादरले!:सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; सासरा अन् दिराविरुद्ध गुन्हा दाखल




कात्रज परिसरात छळाला कंटाळून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या सासऱ्यासह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महिलेने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या बहिणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सासरे हनुमंत काळे आणि दीर रतन (रा. वंडरसिटी सोसायटीजवळील झोपडपट्टी, कात्रज) यांच्यावर छळाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासरे आणि दीर महिलेचा सतत छळ करत होते. लाकडे फोडण्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या छळामुळेच महिलेने आत्महत्या केल्याचे बहिणीने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत. अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करत केला गर्भपात अल्‍पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखून तिच्‍यावर बलात्कार करून नंतर ती गर्भवती राहिल्‍यानंतर तिचा गर्भपात घडवून आणणाऱ्या आरोपीवर सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल उर्फ सागर वसंत रानडे (24, रा. शेडगे डेअरी, हिंगणे खुर्द, सिंहगडरोड) असे गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी 2025 ते 15 मार्च 2026 दरम्‍यान घडला. आरोपीने मुलीचा गर्भपात घडवून आणल्‍यानंतर तिच्‍या चारित्र्यावर संशय घेत तिच्‍याशी लग्न करण्यास नकार दिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *