Headlines

महिला आरक्षण बिल: पुणे महिला काँग्रेसचे भाजपविरोधात आंदोलन:स्वाती शिंदे यांची त्वरीत अंमलबजावणीची मागणी, खोटा प्रचार थांबवण्याचे आवाहन




पुणे शहर महिला काँग्रेसने बुधवारी महिला आरक्षण विधेयक त्वरित लागू करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलन केले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपने खोटा प्रचार थांबवून २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन झाले. आंदोलकांनी ‘भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ’, ‘आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो’, ‘महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणांचे फलक हातात घेतले होते. यावेळी बोलताना स्वाती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली. महिला आरक्षणाचे श्रेय घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून, महापालिका, जिल्हा परिषदा आणि सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजप नेत्यांना खडसावले. महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनात नगरसेसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड. अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड. राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनिषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन हरिश्चंद्र सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *