![]()
पांडे करमाळा तालुक्यात शेती पंपाच्या केबल व तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची गरज असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा मांगी तलावाच्या सांडवा परिसरातील शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. शनिवार दि. ३० मे रोजीच्या मध्यरात्री झालेल्या चोरीत १३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या १५ हजार फुटांहून अधिक केबलमधील तांब्याच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. उन्हाळ्यात शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी महावितरणकडून मिळणाऱ्या ठराविक वेळेच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून असतात. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे शेतीपंपांच्या केबल कापून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. मांगी परिसरात गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा अशी मोठी चोरी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही तालुक्यातील गुलमोहरवाडी, पोमलवाडी, हिंगणी, सोगाव, उंदरगाव, केत्तुर, वाशिंबे व खातगाव या उजनीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीपंपांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या घटना घडल्या गुढीपाडव्याला २५ शेतकरी चोरीचे बळी ^दि. १९ मार्च रोजी झालेल्या चोरीत माझी सुमारे ७० फूट केबल चोरीला गेली होती. आता पुन्हा १०० फूट केबल चोरट्यांनी नेली आहे. आधीच पाण्याची टंचाई आणि अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत. त्यातच वारंवार केबल चोरी होत असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. – नितीन नरसाळे, शेतकरी, मांगी. सांडवा परिसरात यापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी, दि. १९ मार्च रोजी २५ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्या वेळी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, याबाबत आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. आहेत. शेतकऱ्यांना वारंवार नवीन केबल खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भार वाढत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Source link
मांगी येथे केबल चोरट्यांचा धुमाकूळ, 130 हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान:गेल्या 3 महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप