![]()
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज (१९ जुलै) प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे माऊलींच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्हाभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पालखी स्वागतासाठी प्रशासनासह भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. दि.८ जुलै रोजी प्रस्थान ठेवलेला पालखी सोहळा आज सकाळी सुमारे ११ वाजता धर्मपुरी गावाच्या पश्चिमेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने माऊलींचे २१ तोफांच्या सलामीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. स्वागत सोहळ्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कार्तिकेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सकाळी १० वाजेपासून उपस्थित राहणार आहेत. धर्मपुरी बंगला येथे माऊलींची आरती झाल्यानंतर काही काळ विसावा घेतला जाईल. त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळा नातेपुते येथे मुक्कामासाठी रवाना होणार आहे. पालखी मार्गाच्या दुभाजकांवरील लाल, पिवळी आणि पांढरी फुलेही माऊलींच्या स्वागतासाठी बहरलेली दिसत आहेत. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. संध्याकाळचा मुक्काम नातेपुते या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम असून नातेपुतेकरांनी स्वागताची जोरदार तयारी केली आहे. नातेपुते पालखीतळावरती मुरमीकरण केले आहे, तसेच झाडेझुडपे तोडण्यात आलेली आहेत. हायमास्ट दिवे दुरुस्ती, विद्युत मोटारी नूतनीकरण व साठवण तलावातील स्वच्छता, गटारी स्वच्छता, महिलांसाठी स्नानगृह, हिरकणी कक्ष, शहरांमध्ये व परिसरामध्ये फॉगिंगसाठी जंतुनाशके, सुलभ शौचालयाची सुविधा तसेच तात्पुरती फिरती शौचालये ठेवण्याचे नियोजन केले आहे. माउलींचा कट्टा रंगरंगोटी करण्याचे काम चालू आहे. तसेच पालखी तंबूजवळ जनरेटरची सोय केलेली आहे. {स्वागताच्या ठिकाणी ३० बाय १०० फूट लांबीचा शामियाना उभा करण्यात आला आहे. चार एकर मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून अडीच एकर जागेमध्ये वाहनतळाची सोय करण्यात आली. {पुरुषांसाठी ६० व महिलांसाठी ६० युनिटची स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. वारीतील वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी १०० नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखीचे स्वागताच्या ठिकाणी आरोग्य विभाग कक्ष उभारण्यात आले आहे. नातेपुते येथे जिल्ह्यामधील पहिला मुक्काम
Source link
माऊलींच्या स्वागताला 21 तोफांची सलामी:धर्मपुरी गावात होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन