Headlines

मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात:जिल्हाधिकारी, विभाग नियंत्रकांना निवेदन; महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक‎



राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने

.

चालकांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना नऊ दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत आगामी काळात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रकांना निवेदन दिले. यावेळी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर चऱ्हाटे, विभागीय सचिव उदय गंगाखेडकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगे, कामगार संघटनेचे सचिव रुपम वाघमारे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे, सचिव नंदरत्न खंडारे, महिला प्रतिनिधी सविता नागवंशी, राजेश राऊत, असिफ खतीब, गोविंद पाताळपंची, भूजिंग गाळे, अंबादास नागे, सतिष दोड, मनिष लाहूळकर, चंद्रमणी इंगळे, काँग्रेस इंटकचे विभागीय सचिव शंकर पाटकर, इर्शाद खान पठाण, सचिन तायडे, अब्दुल जाफर, ज्ञानेश्वर टाले, नंदकिशोर गावंडे, मनीष शेवाने, संतोष मोकळकर आदी होते.

असे होईल आंदोलन मागण्या पूर्ण करण्यात याव्यात म्हणून संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरवले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आता २२ जून २०२६ रोजी दुपारी २ ते २.३० या दरम्यान प्रत्येक आगारात द्वारसभा होणार आहे. त्यानंतर २९ जूनपासून धरणे आंदोलन होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *