![]()
मुंबई भाजप अध्यक्षांनी या मृत्यूंची निर्लज्जपणे थट्टा उडवली आहे. ‘एक जण झाड पडून मेला तर दुसरा मॅनहोलमध्ये मेला’ असं म्हणत ते दात काढून हसत आहेत. भाजप हा जगातील सर्वात निर्लज्ज पक्ष आहे हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा असंवेदनशील नेत्याची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी. सरकारने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळेच या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून भाजपचे मुख्यमंत्री ‘वर्षा’ बंगल्यावर बसले आहेत. 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात मुंबई तुंबली आहे. माणसं आणि गाड्या पाण्यात वाहून जात आहेत. मग हा नालेसफाईचा पैसा कोणाच्या खिशात गेला? हा कोणाचा कमिशनचा खेळ आहे? या लोकांनी मुंबई महानगरपालिका तर लुटलीच, पण तिकडे राम मंदिर लुटायलाही मागे-पुढे पाहिले नाही.
कोणीतरी डोळे उघडे ठेवून परखडपणे सत्य मांडतय ‘नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे आणि विरोध केल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत,’ अशी तोंडी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केली आहे. या टिप्पणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे ऐकल्यानंतर मी रोमांचित झालो. देशात अजूनही कोणाचा तरी आत्मा जागा आहे आणि कोणीतरी डोळे उघडे ठेवून परखडपणे सत्य मांडत आहे. अशा लोकांमुळेच देशाचे संविधान टिकून राहील. अमित शहा यांच्याविरोधात घोषणा दिल्या म्हणून जर कोणाला तडीपार केले जात असेल, तर देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे असे म्हणता येणार नाही. विरोध संपवणे आणि सत्तेवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचेच काम सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले. केवळ ‘उबाठा’ कार्यकर्त्यांवरच गुन्हे अंबेगाव येथे बिबट्याच्या दहशतीविरोधात झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाचा दाखला देत राऊतांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले की, त्या आंदोलनात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा सर्वच पक्षांचे 1000 ते 1200 लोक उपस्थित होते. तो एक सामाजिक प्रश्न होता. मात्र, गुन्हे केवळ आमच्याच कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले. दिलीप वळसे पाटील यांच्या सांगण्यावरून ही पक्ष पाहून कारवाई करण्यात आली, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. घोटाळेबाजांना पक्षात घ्यायचं आणि विरोधकांना तुरुंगात डांबायचं, हाच सध्याचा एककलमी कार्यक्रम असल्याचा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी साडे बारा वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Source link