Headlines

‘माण, कोरडा’वरील 19 बंधारे कोरडे टेंभूच्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा:17 गावामधील 3300 हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके धोक्यात‎




सांगोला तालुक्यातील शेतीला आधार देणाऱ्या माण आणि कोरडा नद्यांवरील १८ बंधारे सध्या पाण्याअभावी कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदीपात्रात पाणी साचले नाही, परिणामी ३३०० हेक्टर क्षेत्रातील पिके आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतीसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, प्रशासन कधी पावले उचलणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. तालुक्यातील माण नदीवर १७ आणि कोरडा नदीवर २ असे एकूण १९ बंधारे आहेत. यापैकी १८ बंधाऱ्यात पाणीसाठा शून्य झाला आहे. यामुळे खवासपूर, नाझरे, वाटंबरे, कडलास, मेथवडे यासह १७ गावांतील शेतकरी त्रस्त आहेत. नदी कोरडी पडल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळीही खालावली आहे. साधारण ३० टक्के बागायत आणि ७० टक्के उन्हाळी पिके कडक उन्हामुळे होरपळत आहेत. १९ पैकी १० ते १२ बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. नियमानुसार दोन वर्षांत दरवाजे बदलणे अपेक्षित असताना, कंत्राटदार केवळ दरवाजे काढण्या-बसविण्याचे काम करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. ^नदीवरील दोन बंधाऱ्या मधील अंतर ३.५ किमी आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होत असतो. बंधाऱ्यावरील दरवाजे कंत्राटदार योग्य प्रकारे व पूर्ण दरवाजे काढून बसवत नाहीत. अर्धवट दरवाजे काढल्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला गाळ साचल्याने पाणी निचरा व साठा होत नाही. त्याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वैजनाथ घोंगडे, माण नदी पुनर्वसन अभ्यासक ^”दरवाजे बदलण्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदार केवळ थातूरमातूर कामे करत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष करत आहे.” रघुनाथ पाटील (शेतकरी, नाझरे) . टेंभूच्या पाण्याची मागणी: उन्हाळी पिके वाचवण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी वारंवार होत आहे, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. . तलावांची स्थिती: चिंचोली, जवळा आणि घेरडी तलावात काही प्रमाणात पाणी आहे, तर अचकदाणी भरण्याचे काम सुरू आहे. हंगिरगे तलाव मात्र पूर्णपणे रिकामा आहे. . पिण्याचे पाणी: तालुक्यातून अद्याप टँकरची मागणी झालेली नाही, शिरभावी योजनेतून पिण्याचा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *