![]()
नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी अकोला शहरात शनिवारी, १८ एप्रिल रोजी मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदापेठ येथे बुवाबाजी विरोधी परिषदेचे आयोजन केले आहे. दुपारी १ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही परिषद चालणार असून समारोप प्रा.श्याम मानव यांच्या “बुवा तिथे बाया’ (खरात फाईल्स बळी स्त्रियांचा) या विषयावरील जाहीर सभेने होणार आहे. आयोजन अकोल्यातील सर्व सुजाण नागरिक व विविध सामाजिक संघटना मिळून आम्ही सारे अकोलेकर या नावाने केले आहे. परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे असतील तर उद्घाटन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, डॉ. गजानन नारे, प्रा. संतोष हुसे, डॉ. दीपक मोरे, विजय कौसल, चंद्रकांत तराळ, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रा. मुकुंद भारसाकळे, डॉ. रणजीत कोरडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. मिलिंद चौखंडे, डॉ. सीमा तायडे, डॉ. झिशान हुसैन, पराग गवई, प्रकाश दाते, राधाताई बिडकर, सौरभ वाघोडे, अॅड. रुपाली राऊत व अॅड. अनिल लव्हाळे उपस्थित असतील. बुवाबाजी विरोधी परिषद व जाहीर सभा निःशुल्क असून परिषदेत नोंदणी साठी 9881597237 क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन अयोजकांनी केले परिषदेत तीन सत्र राहणार आहेत. यात बुवाबाजी व महिलांची मानसिकता, भूतप्रेत, तंत्रमंत्र, देवी अंगात येणे जादूटोणा (चमत्कार प्रत्यक्षिकांसह), ज्योतिषशास्त्र नशीब खरे की खोटे? असे तीन सत्र होणार असून या सत्रांना अनुक्रमे डॉ. आशा मिरगे, शरद वानखडे, अशोक घाटे व पुरुषोत्तम आवारे मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्नांची उत्तरे मिळणार परिषदेचा समारोप प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाने होणार असून त्यात कॅप्टन खरात सारख्या ढोंगी बुवा-बाबांना महिला का बळी पडतात? ते महिलांना कोणती प्रलोभने देतात? महिलांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात? अशा बुवाबाजीपासून आपले व कुटुंबातील महिलांचे कसे रक्षण करावे? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणार आहेत. तथा आजपर्यंत शेकडो बुवाबाबांचे केलेले भांडाफोड मांडणार आहेत.
Source link
बुवाबाजी विरोधी परिषद आज; भोंदूगिरीवर प्रहार:प्रा. मानवांचे "बुवा तिथे बाया'' विषयावर व्याख्यान