Headlines

उकाड्याचा थेट सामना; गावोगावी ‘इन क्रिस’:उपाययोजनांचा आढावा, जिल्हा प्रशासन उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज‎




जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सतत बदलत्या हवामानात शेतकरी, शेतमजूर, कामगार, मजूर, आशा सेविका यांचे उन्हापासून संरक्षण व त्यांची शारीरिक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ‘इंटिग्रेटेड क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट इन इंडिया’ (इन क्रिस) हा प्रकल्प जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक, म्हणजेच शेतकरी आणि कृषी कामगारांचे उर्वरित. पान ४ ^शहरासह जिल्ह्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. शुक्रवारी १७ रोजी कमाल तापमान ४४.४ तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. २० एप्रिलपर्यंत सतत तापमान वाढणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतर काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. – प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ. सकाळी ११ नंतर सायंकाळी ५.३० पर्यंत काम करू नये ^जिल्ह्यात तापमान ४४ अंशावर पोहोचल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, घरकामगार, मजूर, आशा सेविका, कटल्यावर साहित्याची वाहतूक करणाऱ्यांनी वाढत्या तापमानात स.११ वाजतानंतर तसेच सायंकाळी ५.३० वाजताच्या आधी काम करू नये. कारण, त्यांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. तसेच सतत घाम येत असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन डीहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. कारण, सध्या वाढते तापमान अपायकारक ठरू शकते. त्यामुळे धोका कोणीही पत्करू नये. – डॉ. वसंत लुंगे, राष्ट्रीय सहसचिव, आयएमए.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *