Headlines

सिल्लोडमध्ये ‘एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम:10 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प, ‘वृक्षवल्ली टीम सिल्लोड’च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात उपक्रम‎



वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने केवळ झाड न लावता त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे, याच उद्देशाने येथील ‘वृक्षवल्ली टीम सिल्लोड’च्या वतीने १०,००० वृक्ष लागवडी

.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षवल्ली टीमचे डॉ. शेखर दौड व योगेश दिवटे उपस्थित होते. झाडे आपली जीवनदायिनी आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे डॉ. शेखर दौड यांनी सांगितले. वृक्षवल्ली टीमचे योगेश दिवटे यांनी सांगितले की, १० हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पांतर्गत आतापर्यंत अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचे काम केले जात आहे. प्राथमिकचे मुख्याध्यापक गजानन डमाळे यांनीही वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना हवामान बदलाचे संकट व वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून झाडे जगवण्याची शपथ दिली.

सूत्रसंचालन डॉ. रमेश काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश सोनवणे, लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, कडूबा गीते, रमेश परदेशी, अंगद काळे, गणेश चव्हाण, भास्कर सागरे, अरविंद सोनवणे, डॉ. अमोल ताटू, गजानन दौड, संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे, हर्षदा सानान्से यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांना विविध रोपांचे केले वाटप विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी आणि त्यांनी झाडे लावून ती जगवावीत, यासाठी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, पेरू, चिकू, डाळिंब, आवळा, गुलमोहर, चाफा, बकुळ, कांचन, पारिजातक अशा विविध प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यात आले. हे रोपे प्रत्येकाने लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *