Headlines

मान्सून तळकाेकणात दाखल, दाेन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार:युरोपीय हवामान संस्थेने इशारा देत केला दावा




देशात मान्सूनची वाटचाल तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. शनिवारी मान्सून गोवा ओलांडून महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील देवगड शहरात दाखल झाला. दुसरीकडे, आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागातील अनंतपूरसह तामिळनाडूच्या चेन्नईमध्येही त्याने धडक दिली. एवढेच नाही, तर ईशान्येतील मिझोराम आणि मणिपूरमध्येही मान्सून पोहोचला आहे. शनिवारी मान्सूनच्या उत्तरेकडील सीमेचे पश्चिम टोक सुमारे १६५ किमी पुढे सरकले, तर पूर्व टोक सुमारे ४५० किमी पुढे गेले. हवामान विभागाचा अंदाज आहे की, पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांसह तेलंगणा आणि ईशान्येच्या इतर राज्यांत पोहोचण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. ६ जूनपर्यंत देशात सामान्यतः १९ मिमी पाऊस पडायला हवा. आतापर्यंत १५.१ मिमी पाऊस झाला आहे, जो सध्या २० टक्के कमी आहे. असे असले तरी, एल निनो विकसित होण्याची शक्यता असूनही सध्या देशात मान्सूनची वाटचाल सुरळीत सुरू आहे. रावेर, यावलला दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस रावेर, यावलला शनिवारी सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाचा तडाखा बसला. ताशी ३० ते ४० वेगाच्या ‌वाऱ्याने राजोरा शिवारात ५ हजार, तर निमगाव येथे ३३०० केळीची झाडे आडवी झाली. अंजाळे येथे अनेक घरांवरील पत्रे उडाले. ८ खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. झाडे पडल्याने अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावर वाहतूक सुमारे तासभर ठप्प होती. राज्यामध्ये वातावरण अनुकूल: तज्ज्ञांचा दावा महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार झाल्याचा दावा हवामानतज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी केला आहे. ७ जून रोजी रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशांत महासागर तापला, ही अल निनोची सुरुवात नवी दिल्ली | युरोपीय हवामान संस्थेनुसार, प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होत आहे. उष्णकटिबंधीय प्रशांत क्षेत्राने ती महत्त्वाची तापमान मर्यादा ओलांडली आहे, जी एल निनोच्या सुरुवातीचे संकेत देते. या वर्षी डिसेंबरपर्यंत प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांपर्यंत वाढू शकते. जर हा अंदाज खरा ठरला, तर या वर्षीचा एल निनो तापमान खूप जास्त वाढवेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *