Headlines

मान्सून मुंबईच्या दिशेने, राज्यात यलो अलर्ट:मान्सूनचा वेग जास्त, पण देशात अद्यापही सरासरीपेक्षा 22% कमी पाऊस




केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस ईशान्येतील सर्व राज्ये, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला असून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. मात्र, मान्सूनचा वेग जास्त असूनही देशात झालेला पाऊस सरासरीपेक्षा 22% कमी आहे. 1 ते 8 जूनपर्यंत 21.3 मिमी पाऊस झाला, तर सरासरी आकडा 27.2 मिमी आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सून 16 राज्यांपर्यंत पोहोचला आहे. पुढील 24 तासांत तो मुंबईत, त्यानंतर 3 ते 5 दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भागासह आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडपर्यंत पोहोचू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून संथ होता. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थितीमुळे वेग वाढला. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रात कोकणासह संपूर्ण राज्यभरात 2 ते 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 12 जूनपर्यंत तर विदर्भात 13 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

एल निनो प्रभावातील 197 जिल्ह्यांसाठी योजना तयार कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारने देशभरातील असे 197 जिल्हे निश्चित केले आहेत, जे एल निनोच्या प्रभावाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील आहेत. कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी वेगवेगळ्या आकस्मिक योजना तयार केल्या आहेत. अनेक भागांत उष्माघाताचा प्रकोप हवामान विभागाने 9 ते 11 जूनपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम यूपीमध्ये उष्माघाताचा इशारा दिला आहे. राज्यात अवकाळी पावसाने 39 दिवसांत 56 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त राज्यात 39 दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वेगवान वादळी वाऱ्यांमुळे शेती क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून, तब्बल 56 हजार 533 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य प्रशासनाने जाहीर केला आहे. या अस्मानी संकटामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांतील शेतकरी पुरता अडचणीत सापडला असून नगदी फळबागा, भाजीपाला आणि हंगामी पिके मातीमोल झाली आहेत. नुकसानग्रस्त भागात सध्या महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, अंतिम अहवाल आल्यानंतर मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. मात्र, ऐन खरिपाच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 1 मे ते 8 जून या 39 दिवसाच्या कालावधीत मोठे नुकसान सोसावे लागले आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना हातची पिके नष्ट
राज्यात एकूण बाधित क्षेत्र
56 हजार 533 हेक्टर (1 लाख 41 हजार 332 एकर)
मे महिन्यातील तडाखा असा
40 हजार 215 हेक्टर (1 लाख 523 एकर) क्षेत्र प्रभावित
जूनमधील आठ दिवसांचा कहर
1 ते 8 जून या अवघ्या आठ दिवसांत 10 जिल्ह्यांमध्ये 17 हजार हेक्टर बदलत्या हवामानाचे गंभीर आव्हान, तातडीच्या मदतीची मागणी हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांत अवकाळीचे संकट अधिक गडद होत चालले आहे. एकीकडे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना, दुसरीकडे हातात असलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. “शासनाने केवळ पंचनाम्यांचे सोपस्कार न करता, तत्काळ विशेष पॅकेज जाहीर करून बळीराजाला थेट आर्थिक दिलासा द्यावा,” अशी आर्त हाक आता शेतकरी संघटना आणि बाधित शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. 4 जिल्हे सर्वाधिक प्रभावित याचा फटका जळगाव, बुलढाणा, सोलापूर आणि अकोल्याला बसला आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे येथील उभ्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले. बाधित झालेली मुख्य पिके: केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा, टरबूज, कलिंगड यासारख्या नगदी पिकांसह गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांदा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *