![]()
नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौलाना आझाद कॉलनी येथे बंद घर फोडून तब्बल ४९८ ग्रॅम सोने आणि दोन लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याचा गुन्हे शाखेने अवघ्या सहा दिवसांत छडा लावला. त्याच्या मावशीकडे पाहुणा म्हणून आला होता. त्याचदरम्यान तक्रारदाराचे बंद घर त्याच्या नजरेस पडले. घर बंद असल्याची संधी साधून त्याने घरात प्रवेश केला आणि सोन्या-रोकडवर डल्ला मारला. चोरीचे संपूर्ण सोने तसेच १ लाख ७० हजार रुपये जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १७) करण्यात आली. मौलाना आझाद कॉलनीतील रहिवासी मोहम्मद मुजतबा अली हे शहरातील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान ९ ऑगस्टला ते कुटुंबीयांसह अचलपूर येथे कौटुंबिक सोहळ्यासाठी गेले होते. ११ ऑगस्ट रोजी ते घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील कपाटात ठेवलेले ४९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रोकड गायब होती. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेनेही चोरट्याचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे पीआय अतुल वर आणि पीआय दिनेश दहातोंडे यांच्या पथकाने घटनेच्या दिवसापासूनच चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे हा चोरटा अकोला येथील असून सध्या अमरावती शहरात असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वेलकम पॉइंट परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने चोरी केलेले सोने आणि रोकड घरी ठेवली होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ४९८ ग्रॅम सोने आणि १ लाख ७० हजार रुपये रोकड जप्त केली. ^या प्रकरणात आम्ही अल्पवयीनाला ताब्यात घेत ४९८ ग्रॅम सोने आणि १.७० लाख रुपये रोकड जप्त केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यासह शहरातील आणखी काही चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. – अतुल वर, पीआय , प्रमुख गुन्हे शाखा युनिट क्रमांक २. वयाच्या १५व्या वर्षी चोरले होते ७०० ग्रॅम सोने या अल्पवयीन आरोपीचा यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्याशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्याने तब्बल ७०० ग्रॅम सोन्यावर डल्ला मारला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्याची चोरीची पद्धत आणि पूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
Source link
मावशीकडे पाहुणा म्हणून आला अन् शेजारी डल्ला मारला:अल्पवयीन चोराचा 70 लाखांचा कारनामा, 6 दिवसांत गुन्हे शाखेने उघड केली चोरीची घटना