Headlines

मुंबईत लवकरच धावणार ‘देवाभाऊ’ आणि ‘छावा’ टॅक्सी:खासगी कंपन्यांच्या कमिशनला राज्य सरकारचा मोठा शह; वाचा काय आहे योजना?




मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ओला आणि उबेर सारख्या खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि टॅक्सी चालकांच्या फायद्यासाठी राज्यात लवकरच ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांचे खिसे हलके होणार नाहीत, तर चालक आणि वाहन मालकांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. खासगी कंपन्यांच्या अवाजवी कमिशनला बसणार चाप! भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या नव्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या बाजारात असलेल्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या खासगी कंपन्या चालकांकडून कमिशन आकारतात. यामुळे दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांच्या हातात अतिशय कमी उत्पन्न पडते. या लुटीला पर्याय म्हणून सहकार तत्त्वावर आधारित ही नवीन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. ‘भारत टॅक्सी मॉडेल’च्या धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी दिल्ली आणि कोलकाता येथे सरकारी पाठबळ असलेल्या टॅक्सी सेवा यशस्वी ठरल्यानंतर, महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर ‘देवाभाऊ टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ ॲप विकसित केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘भारत टॅक्सी मॉडेल’मुळे देशभरात चालकांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बैठकीत ‘हिरवा कंदील’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विशेष बैठक घेऊन या योजनेला हिरवा कंदील दाखवला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व धोरणात्मक आणि कायदेशीर बाबी निश्चित केल्या आहेत. या नव्या सरकारी ॲप-आधारित सेवेसाठी आवश्यक नियमावली पूर्ण झाली असून, लवकरच ही टॅक्सी सेवा मुंबईच्या रस्त्यांवर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. गिरगावातील ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवे वळण!:मनसैनिकावर गुन्हा दाखल; मनसेचा सवाल – नियम आमच्यासाठीच का? मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या कथित ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाने आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणात आंदोलन करत पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *